Posts

Showing posts from August, 2021

साईमंदिर भाविकांना दर्शनासाठी जरी बंद , भाविकांची माञ पावसातही कळसाचं , द्वारकामाई समोर दर्शनासाठी हजेरी

Image
पंकज भालेराव  श्वावणसरी बरसल्या , वातावरण बहरले शिर्डीत साईंच्या समाधी मंदिरासमोर अगदी न चुकता मध्यान्ह आरतीसाठी आणि बाहेरून साईंचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची हजेरी माञ कायम आहे. जिल्ह्यासह तालुक्यात दडी मारुन बसलेल्या वरुण राजाने पुन्हा दमदार हजेरी लावली असुन वातावरण गारवा आणि शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. गेली दिड वर्षे काही दिवस वगळता कोरोना प्रादुर्भावाने शासनाच्या आदेशाने साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे साईमंदिर बंद असल्याने शिर्डीसह पंचक्रोशीतील अर्थकारण ठप्प झाले आहे माञ मंदिर बंद असतांना शिर्डी सह बाहेरून येणारे साईभक्त हे साईबाबा मंदिराच्या कळसाचे , द्वारकामाई , चावडीचे बाहेरून दर्शन घेऊन समाधान व्यक्त करत आहे. गेल्या दोन दिवसापासून श्वावणसरी कोसळत असतांनाही साईभक्तांची छञी घेऊन तर कधी पावसात चिंब होऊन साईदर्शनासाठी गर्दी कायम आहे. शिर्डीतील अनेक साईभक्तांची दिवसाची सुरवात ही साईदर्शनाने होत असते ,  कोरोनामुळे मंदिरामध्ये प्रवेश नाही माञ असे असतांनाही आपल्या श्रद्धेत कणभरही बदल न होता हे साईभक्त साईमंदिरासमोर दर्शनासाठी हजेरी लावत आहे. ...