Posts

सामाजिक कार्यकर्ते विजय नगरकर यांचाम.लो.वसुंधरा समाजगौरव पुरस्काराने सन्मान !!

Image
श्रीरामपूर (प्रतिनिधी) - येथील सामाजिक कार्यकर्ते विजय दत्तात्रय नगरकर यांचा नुकताच "वसुंधरा सेवाभावी संस्था इचलकरंजी (जि. कोल्हापूर)" यांच्यावतीने "महाराष्ट्र लोकरत्न वसुंधरा समाजगौरव पुरस्कार सन- २०२१" पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.रविंद्र आरळी (संचालक : केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय महामंडळ (भारत सरकार),उद्घाटक  प्रशांत देवकर (संचालक : झेड प्लस सुरक्षा सिक्युरिटी) तर सौ.सुनिता शेळके (उपसभापती : महिला व बालकल्याण, इचलकरंजी नगरपरिषद), सौ.ज्योती पाटील  (महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी),विजय माणगावे (कोल्हापूर जिल्हा ऑफिसर : ऍनिमल वेल्फेअर बोर्ड (भारत सरकार),राजू लायकर (निरिक्षक : कोल्हापूर जिल्हा सहकारी बँके), अॅड.सूर्यकांत मिरजे (विशेष सरकारी वकील),हविजय तोडकर (संपादक : साप्ताहिक वसुंधरा शक्ती)आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री.नगरकर यांना आपले आजोबा सामाजिक कार्यकर्ते स्व.डॉ.शिवराज नगरकर यांच्याकडून समाजसेवेचा वारसा लाभला आहे, स्व.डॉ.शिवराज नगरकर यांचे श्रीरामपूर शहर परिसरात मोठे सामाजिक योगदान आहे,तथा वड...

साई निर्माण करिअर ॲकॅडमीतील विद्यार्थ्यांचा दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेत दबदबा ११ सुवर्ण पदक व २ रौप्य पदकांची कमाई

Image
शिर्डी / प्रतिनिधी  दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत शिर्डी येथील साई निर्माण करिअर ॲकॅडमीतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले असुन या स्पर्धेत   स्नेहल देवकर - गोळा फेक (सुवर्ण पदक) शुभांगी कापकर-400 मीटर (सुवर्ण पदक)  राणी सावंत-100 मीटर (सुवर्ण पदक)   वैभवी दणके-200 मीटर (सुवर्ण पदक) विजय थोरात-100 मीटर(सुवर्ण पदक) ओम रोकडे-3 km-U 17-(सुवर्ण पदक) साई मार्कंड-U 20- 3 km(सुवर्ण पदक) सागर वाकचौरे-800 मीटर(सुवर्ण पदक) ऋषिकेश काटे-10 km (सुवर्ण पदक) सचिन पवार-गोळा फेक(सुवर्ण पदक) शिवम पाचोरे- कुस्ती 57.kg(सुवर्ण पदक) वणेश आरणे-5 km (रौप्य पदक) शुभम जमधडे-200 मीटर (रौप्य पदक) प्रमोद कदम - सर्वात जास्त सुवर्ण पदक मिळवले आहे. या स्पर्धेत एकूण 10 राज्यातील टीम सहभागी होत्या महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, राज्यस्थान, पंजाब, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ. या पैकी महाराष्ट्र राज्यातून 3 टिम 10 राज्यांमधून साई निर्माण अकॅडमी चे सर्वात जास्त 13 पैकी 11 Gold 2 silver  हि राज्यस्तरीय स्पर्धा होती.  या सर्टीफिकेट...

शिवराष्ट्र प्रतिष्ठाण ची स्थापना , शेकडो तरुणांच्या उपस्थितीत उद्धाटन..!!संस्थापक विजयराव काळे , शिवाजी चौधरी यांनी बांधली तरुणांची राजकारण विरहीत मोट

Image
शिर्डी / प्रतिनिधी   शिर्डी नजीकच्या निमगाव येथील पालखी निवारा येथे राहता तालुका शिवराष्ट्र प्रतिष्ठाण या संघटनेची स्थापना करण्यात आली..या संघटनेचे संस्थापक म्हणुन शिवाजी चौधरी आणि विजयराव काळे आदीसह तालुक्यातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे प्रतिष्ठाण कोणतेही राजकीय व्यासपीठ नसून या प्रतिष्ठाणात सर्व समाजाचे बांधव समाविष्ट असणार असुन तरुणांचे हक्काचे व्यासपीठ म्हणुन या प्रतिष्ठाणची स्थापना करण्यात आल्याचे सांगत लवकरच प्रत्येक गावात प्रतिष्ठाण ची शाखा सुरु करण्यात येणार असुन चितळी गावात प्रथम शाखेचे भव्य उद्धाटन होणार असल्याचे शिवराष्ट्र प्रतिष्ठाण चे संस्थापक विजयराव काळे यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराजांचे पुजन करत ज्योत लावून कार्यक्रमास सुरवात आली. प्रसंगी शिवराष्ट्र प्रतिष्ठाणचे संस्थापक विजयराव काळे , शिवाजी चौधरी ,निखिल काळे , दिगंबर परजणे , विठ्ठल पवार , अमोल खापटे , सावळीराम डांगे , हनुमंत अवचर , राजाबाबु चौधरी , अतुल चौधरी , पप्पु गाढवे , विजु वायकर , राकेश जाधव , किरण जपे , वैभव कोते , नानक सावंञे , भानुदास ...

राहता नगरपालिकेत भारतीय संविधान दिन साजरा , प्रतिमेचे पुजन करुन संविधानाचे वाचन

Image
राहता / प्रदिप वराट  भारतीय संविधान दिनानिमित्त राहता नगरपालिकेत संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी नगराध्यक्षा  ममता पिपाडा , यांच्या हस्ते भारतीय संविधान तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण, डॉ. राजेंद्र पिपाडा, गटनेते विजय सदाफळ, दशरथ तुपे तसेच राहाता नगरपरिषदेचे कर्मचारी वृंद उपस्थित होते. प्रसंगी   मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी भारतीय संविधानाचे वाचन केले.

नळांद्वारे येणाऱ्या घाण पाण्याची जर नगर पालिका प्रशासन दखल नाही घेणार ! तर हेच घाण पाणी बाटलीत बंद करुन नगर पालिका अधिकाऱ्यांना पिण्यास देणार !!

Image
नळांद्वारे येत असलेल्या दुषीत घाण पाण्यामुळे श्रीरामपूरकरांचे आरोग्य धोक्यात ; समाजवादी पार्टी आंदोलनाच्या पावित्र्यात श्रीरामपुर (प्रतिनिधी) - श्रीरामपूर नगर पालिकेमार्फत पिण्याच्या पाण्याचा घराघरात पाणी पुरवठा करणाऱ्या जल वाहिन्यांद्वारे (नळ कनेक्शन) दुर्गंधीयुक्त घाण पाणी येत असल्याने शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असल्यानचे समाजवादी पार्टीच्यावतीने मुख्यधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे,येत्या आठ दिवसांत नळाद्वारे येत असलेले दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा योग्य बंदोबस्त न केला गेल्यास समाजवादी पार्टीतर्फे नगर पालिकेसमोर उग्र स्वरूपाचे आंदोलन आणि आमरण उपोषण छेडण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे, निवेदनात पूढे असेही म्हटले आहे की,सदरील दुर्गंधीयुक्त घाण पाणी पिण्यात येऊन अनेक नागरीकांना जुलाब,वांत्या आणि थंडीतापाच्या साथीने ग्रासले आहे,यात लहान बालकांना मोठा फटका बसत असून रोजच दवाखाने गच्च भरल्याचे निदर्शनास येत आहे, तथा सदरील पाणी पुरवठा करणाऱ्या काही  जलवाहिन्या या गटारीच्या कडेने गेल्या असल्याने बहुतांश ठिकाणी चक्क गटारीचे घाण पाणी मिश्रीत ...

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त ज्येष्ठ पञकार शौकत शेख यांचा सत्कार

Image
  श्रीरामपूर (प्रतिनिधी)  १६ नोव्हेंबर या राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त येथील समता हॉलमध्ये ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांचा ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या वतीने जिल्हाध्यक्ष हाजी फयाजभाई बागवान या़च्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार हा समाजाचा आरसा आहे समाजात घडणाऱ्या विविध बाबींना पत्रकार हा आपल्या लेखणीद्वारे आपल्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून प्रतिबिंबित करत समाज प्रबोधनाचे मोठे कार्य करत असल्याचे इब्राहिम बागवान म्हणाले.तसेच हाजी फयाजभाई बागवान आणि ओबीसी ऑर्गनायझेशन पदाधिकाऱ्यांच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधू- भगिनींना यावेळी शुभेच्छाही देण्यात आल्या. याप्रसंगी समता कॉप्यूटर इन्स्टिट्यूटचे संचालक इंजि.मोहसिन शौकत शेख,समता आरटीओ ऑनलाईन सर्व्हिसेसचे सरताज शौकत शेख, ओबीसी ऑर्गनाईझेशनचे जिल्हा सचिव इब्राहीम बागवान,संघटक जाकीर शाह, कार्याध्यक्ष आरिफभाई कुरेशी,सहसचिव अजीजभाई अत्तार, सहसचिव सरदारभाई (राजू) कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

इंधन दरवाढी विरोधात राहाता तालुका युवासेनेचा शिर्डी काळ्या फिती लावून शहरातून सायकल फेरी

Image
शिर्डी / प्रतिनिधी  केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल तसेच गँस दरवाढी विरोधात निषेध व्यक्त करत शिर्डी शहरातून सायकल फेरी काढत युवासेना राहाता तालुक्याच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. शिर्डी येथील नगरपंचायत पासून कार्येकर्तांनी काळ्या फिती लावून शहरातून सायकल फेरी काढली. यावेळी युवासेना राहाता तालुका प्रमुख संदिप विघे , उप तालुका प्रमुख प्रताप निर्मळ , युवासेना नेते प्रसाद पाटील , अमरराजे गायकवाड , राजु कुदळे , आदित्य गुंजाळ , कैलास बागुल , राजु धटींग ,ऋषिकेश पगारे , रोहीत मगर , आदीसह पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते. प्रसंगी अमरराजे गायकवाड यांनी मोदी सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध म्हणुन शहरातून शांततेच्या मार्गाने सायकल फेरी काढली असुन जनता या दरावाढीमुळे होरपळून निघाली आहे सर्वसामान्य नागरिकांना आपला उदरनिर्वाह करणे अवघड झाले असुन संपुर्ण महाराष्ट्रात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना सचिव वरुण सरदेसाई , शिर्डी लोकसभा  विस्तारक रणजीत कदम यांच्या आदेशाने हे आंदोलन संपुर्ण महाराष्ट्र छेडले असल्याचे सांगितले