राहता नगरपालिकेत भारतीय संविधान दिन साजरा , प्रतिमेचे पुजन करुन संविधानाचे वाचन
राहता / प्रदिप वराट
भारतीय संविधान दिनानिमित्त राहता नगरपालिकेत संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी नगराध्यक्षा ममता पिपाडा , यांच्या हस्ते भारतीय संविधान तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण, डॉ. राजेंद्र पिपाडा, गटनेते विजय सदाफळ, दशरथ तुपे तसेच राहाता नगरपरिषदेचे कर्मचारी वृंद उपस्थित होते. प्रसंगी मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी भारतीय संविधानाचे वाचन केले.
Comments
Post a Comment