Posts

Showing posts from October, 2021

कै. भाऊसाहेब बनकर यांचा १४ अॉक्टोबर २०२१ रोजी दशक्रिया विधी

Image
शिर्डी शहरातील नावलौकिक फुल प्रसाद दुकान मालक भाऊसाहेब भगवंता बनकर यांचे दि. ५ अॉक्टोबर रोजी हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी दि गुरुवार दि १४ /१०/ २०२१ रोजी नांदुर्खी पाटावर श्रीकृष्ण मंदिर येथे सकाळी ८ वा.होणार आहे. कै. भाऊसाहेब बनकर हे शिर्डीतील फुल प्रसाद दुकानदार म्हणुन सर्वञ परिचित होते तर वडील भगवंता बनकर यांनी तुरळक भाविकांच्या पुरातन  शिर्डीतील मोजकेच फुल हार दुकान असतांना  साईबाबांच्या सेवेत फुल प्रसाद दुकानदार म्हणुन साईभक्तांची सेवा केली आणि त्यांचा हा वारसा कै.भाऊसाहेब बनकर यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपला. आई , पत्नी , दोन मुले नातवंडे , दोन भाऊ  असा मोठा परिवार असलेले मनमिळाऊ तसेच साईभक्त बिरोबा भक्त म्हणुन  पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये त्यांचा मोठा नावलौकिक होता.त्यांचा मोठा मुलगा आशिष बनकर हा उत्कृष्ट व्यवसाय करत आहे तर लहान मुलगा चैतन्य बनकर हा वैद्यकीय सेवेत आपले कर्तव्य यशस्वीपणे पार पाडत आहे. बंधू संजय बनकर यांचा साईभक्तांच्या सेवेत ट्रव्हल्स व्यवसाय तर लहान बंधू राजेंद्र बनकर हे पञकार क्षेत्रात आपले कर्तव...

पुण्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना गंडविणारी टोळी सक्रीय

हेमंत चौधरी / पुणे शिक्षणाचे माहेरघर तसेच ' पुणे तिथे काय उणे' असे म्हटल्या जाणाऱ्या  पुणे शहरातील विविध भागांत सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना गंडविणारी टोळी सक्रीय असल्याचे दिसुन येत आहे.       याबाबत सविस्तर वृत्त असे की,अनेक सुशिक्षित युवक-युवती पुणे या प्रसिध्द शहरामध्ये आपले गाव,आपल्या घरांतील सदस्यांपासुन लांबवर नोकरी मिळविण्यासाठी पुणे येथे येतात.कारण पुणे येथे अनेक प्रकारच्या कंपन्या,उद्योगधंदे,कारखाने आहेत या कारणाने रोजगार मिळविण्यासाठी युवक-युवती येथे  येतात.या पुणे शहरांमधील अनेक भागात जॉब,नोकरीच्या जाहिराती पावलो-पावली लावलेल्या असतात.या माहीतीवर संपर्क क्रमांक दिलेला असतो.त्याचप्रमाणे सुशिक्षित युवक-युवती या संपर्क क्रमांकावर संपर्क करतात व संपर्क केल्यानंतर एखाद्या आॅफीसमध्ये या युवक-युवतींना मुलाखतीसाठी बोलाविले जाते व त्यांना १०००/-,३०००/-,५०००/- रुपये भरा आम्ही तुम्हाला चांगल्या कंपनीमध्ये,चांगल्या प्रकारचा,चांगल्या पगाराचा जॉब देऊ असे सांगुन गंडविले जाते.आपल्या घरापासुन दुर व जॉब,नोकरीच्या शोधासाठी पुणे येथे आल्यानंतर साहजिकच युवक-युवती अशा ...

शिवसेना आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या संपर्क कार्यालयात आघाडीचे महाराष्ट्र राज्य जलसपंदा मंत्री मा जयंत पाटील यांचा मनमाड शिवसेनेच्या वतीने सत्कार

Image
 मनमाड (अजहर शेख )                     नांदगाव तालुका दौऱ्यावर आलेले महाविकास आघाडीचे महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री  ना जयंत पाटील यांच मनमाड येथील शिवसेना आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या संम्पर्क कार्यालयात शिवसेना मनमाड शहराच्या वतीने स्वागत व सत्कार शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, शहरप्रमुख मयूर बोरसे, युवासेना उपजिल्हाअधिकारी मुन्नाभाऊ दरगुडे, गुलाब भाबड, शिवसेना उपशहरप्रमुख जाफर मिर्झा आदींनी केले. याप्रसंगी जिल्हा समनव्यक सुनील पाटील, तालुका उपप्रमुख सुभाष माळवतकर, दिनेश केकाण, नगरसेवक लियाकत शेख, विनय आहेर, सुनील हांडगे योगेश इमले, अंकुश गवळी, माजी सभापती किशोर लहाने, सुभाष उगले, राजू सांगळे, कैलास भाबड, स्वराज करकाळे, सादिक तांबोळी, सचिन दरगुडे, महेंद्र गरुड, पंकज जाधव, कचरू आव्हाड, नंदू पिठे इत्यादी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

जोयफ जमादार यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ नगर पालिकेला टाळे ठोकोआणि रस्ता रोको आंदोलन !जोयफ जमादार यांचा उपोषणाचा ५ वा दिवस

Image
श्रीरामपूर (प्रतिनिधी) श्रीरामपूर नगर पालिकेकडून पुणे येथील डोंबाळे दिशा एजन्सी नावाच्या ठेकेदारास शहरातील घाण-कचऱ्याचा ठेका देण्यात आलेला आहे,त्यास नगर पालिकेकडून दर महिन्याला ३० लाख रुपये देऊनही शहरातील घाण-कचरा रोजच्या रोज व्यवस्थित साफ होत नसल्याने या घाण-कचऱ्यामुळे डासांचा प्रचंड प्रमाणात प्रादुर्भाव वाढला असून शहरात संभाव्य डेंग्यू, मलेरिया, टायफाईड,फ्ल्यू,चिकनगुनिया अशा स्वरुपाच्या साथीच्या आजाराची साथ फैलाऊ पहात आहे,याविषयी नगर पालिकेला वेळोवेळी निवेदने,विनंती अर्ज देऊनही नगर पालिकेकडून संबंधित ठेकेदारास समज देत त्यावर उचित कारवाई करण्याऐवजी उलट त्याची पाठराखण केली जात आहे. शहरातील नागरीकांना संभाव्य रोगराईच्या खाईत ढकलू पाहणाऱ्या संबंधित घाण-कचरा ठेकेदाराचा ठेकाच रद्द करण्यात येऊन दुसऱ्या कोणास देण्यात यावा यामुळे शहरवासियांचे आरोग्य अबाधित राहील तसेच शहरातील पिण्यासाठी ज्या कालव्यातून तलावात पाणी पिण्यासाठी सोडले जाते,त्या कालव्यात पाणी येण्याआधी मेलेली आणी अक्षरशः सडलेली,कुझलेली जनावरे तळ्यात पिण्याच्या पाण्यात वाहून जात आहेत, म्हणून कालव्याला पाणी येण्या आधी सदर...

आशा सेविकांचे मानधन न दिल्यास तिव्र आंदोलन केले जाईल .भाजप युवा मोर्चा

Image
संगमनेर / गणेश खेमनर  भारतीय जनता युवामोर्चा संगमनेर च्या वतीने आ.राधाकृष्ण विखे पाटील व भारतीय जनता युवमोर्चा चे जिल्हाध्यक्ष ॲड.श्रीराज डेरे यांच्या नेतृत्वात कोरोना च्या     कालखंडामध्ये तसेच लसीकरण मोहीम गावागावांमध्ये  घराघरापर्यंत पोहचवून खऱ्या कोरनायोध्या म्हणून काम करणाऱ्या आशा सेविकांना राज्यातील आघाडी सरकार कडून गेल्या ४ महिन्यांपासून त्यांचे मानधन देण्यात आलेले नाही  ते मानधन त्यांना तात्काळ  देण्यात यावे.यासाठी   मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती संगमनेर यांना निवेदन देण्यात आले.हातावर पोट असलेल्या आशा सेवकांनी कोरोनाच्या काळात विविध सर्वे करणे असो घरोघर जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करणे असेल,किंवा सध्या अत्यंत जलदगतीने सुरू असलेली लसीकरण मोहीम असेल.यासाठी कोणतेही साधने उपलब्ध नसताना देखील आपल्या जीवाची पर्वा न करता प्रामाणिकपणे काम करून जनतेची सेवा केली व जनतेला कोरोनाच्या विळख्यातून वाचवण्यासाठी अहोरात्र मेहनत केली.तरी देखील राज्यसरकारने डोळ्यावर भात बांधल्याप्रमाणे जनतेत जाऊन काम करणाऱ्या आशा सेविकांना गेल्या चार महि...