जोयफ जमादार यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ नगर पालिकेला टाळे ठोकोआणि रस्ता रोको आंदोलन !जोयफ जमादार यांचा उपोषणाचा ५ वा दिवस
श्रीरामपूर (प्रतिनिधी) श्रीरामपूर नगर पालिकेकडून पुणे येथील डोंबाळे दिशा एजन्सी नावाच्या ठेकेदारास शहरातील घाण-कचऱ्याचा ठेका देण्यात आलेला आहे,त्यास नगर पालिकेकडून दर महिन्याला ३० लाख रुपये देऊनही शहरातील घाण-कचरा रोजच्या रोज व्यवस्थित साफ होत नसल्याने या घाण-कचऱ्यामुळे डासांचा प्रचंड प्रमाणात प्रादुर्भाव वाढला असून शहरात संभाव्य डेंग्यू, मलेरिया, टायफाईड,फ्ल्यू,चिकनगुनिया अशा स्वरुपाच्या साथीच्या आजाराची साथ फैलाऊ पहात आहे,याविषयी नगर पालिकेला वेळोवेळी निवेदने,विनंती अर्ज देऊनही नगर पालिकेकडून संबंधित ठेकेदारास समज देत त्यावर उचित कारवाई करण्याऐवजी उलट त्याची पाठराखण केली जात आहे.
शहरातील नागरीकांना संभाव्य रोगराईच्या खाईत ढकलू पाहणाऱ्या संबंधित घाण-कचरा ठेकेदाराचा ठेकाच रद्द करण्यात येऊन दुसऱ्या कोणास देण्यात यावा यामुळे शहरवासियांचे आरोग्य अबाधित राहील तसेच शहरातील पिण्यासाठी ज्या कालव्यातून तलावात पाणी पिण्यासाठी सोडले जाते,त्या कालव्यात पाणी येण्याआधी मेलेली आणी अक्षरशः सडलेली,कुझलेली जनावरे तळ्यात पिण्याच्या पाण्यात वाहून जात आहेत, म्हणून कालव्याला पाणी येण्या आधी सदरील कालवा साफ करण्यात यावा,जो कधीच साफ केला जात नाही, यामुळे नागरीकांना अक्षरशः मेलेल्या सडले,कुझलेल्या जनावरेयुक्त पाणी पिणे भाग पडत आहे, तसेच शहरातील वेळोवेळी स्वच्छता होत नसल्याने रोगराई वाढत आहे,सध्या कोरोना महामारीचे संकट इतके भयानक डोक्यावर घोंगावत असताना नगर पालिके भुमिका इतकी उदासिनतेची कशी असू शकते ?, आशा विविध ज्वलंत नागरी समस्यांच्या मागणीसाठी समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोयफ जमादार यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी पासून नगर पालिकेसमोर प्राणांतिक उपोषण सुरु केले आहे,यात उपोषणाला चार दिवस उलटून गेले आणि आजचा चक्क पाचवा दिवस उजाडला तरी संबंधित नगर पालिका प्रशासनाकडून कुठलीच कार्यवाही होताना दिसत नसल्याने तथा सदरील उपोषणास विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांचा पाठिंबा वाढत असल्याने उद्या दिनांक ०४/१०/२०२१ रोजी संविधान बचाव समीती, श्रीरामपूर आणि इतर राजकीय पक्ष तथा सामाजिक संघटनांच्यावतीने नगर पालिकेस टाळे ठोको आणि रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे,
यापासून उद्भवलेल्या बऱ्या व वाईट परिणामाची सर्वस्वी जबाबदारी ही नगर पालिकेवरच राहणार असल्याचे म्हटले आहे.
या निवेदनावर संविधान बचाव समितीचे अहमदभाई जहागीरदार, नागेशभाई सावंत, आदिल मखदूमी,अनंत पटेकर, साजिद मिर्झा, शाहिद कुरेशी, एजाज दारुवाला,फिरोज पठाण, इफ्तेखार शेख,जावेद तांबोळी, अब्दुल पठाण,जावेद कुरेशी, यांच्यासमवेत अनेकांच्या स्वक्षऱ्या आहेत,या निवेदनाच्या प्रति मा.जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख,अपर पोलिस अधीक्षक,उप विभागीय (प्रांत) अधिकारी, तहसिलदार,आणि श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला देण्यात आल्या असून सोमवारी सकाळी १०:३० वाजता श्रीरामपूर नगर पालिकेस टाळे ठोको आंदोलन करुन समस्त कार्यकर्ते रस्तारोको आंदोलन देखील करणार आहेत,हे आंदोलन जरी शांततेच्या मार्गाने होत असलेतरी यापासून उद्भवलेल्या बऱ्या वा वाईट परिणामाची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित नगर पालिकेवर असणार असल्याचेही या निवेदनात शेवटी नमुद करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment