आशा सेविकांचे मानधन न दिल्यास तिव्र आंदोलन केले जाईल .भाजप युवा मोर्चा
संगमनेर / गणेश खेमनर
भारतीय जनता युवामोर्चा संगमनेर च्या वतीने आ.राधाकृष्ण विखे पाटील व भारतीय जनता युवमोर्चा चे जिल्हाध्यक्ष ॲड.श्रीराज डेरे यांच्या नेतृत्वात कोरोना च्या कालखंडामध्ये तसेच लसीकरण मोहीम गावागावांमध्ये घराघरापर्यंत पोहचवून खऱ्या कोरनायोध्या म्हणून काम करणाऱ्या आशा सेविकांना राज्यातील आघाडी सरकार कडून गेल्या ४ महिन्यांपासून त्यांचे मानधन देण्यात आलेले नाही ते मानधन त्यांना तात्काळ देण्यात यावे.यासाठी मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती संगमनेर यांना निवेदन देण्यात आले.हातावर पोट असलेल्या आशा सेवकांनी कोरोनाच्या काळात विविध सर्वे करणे असो घरोघर जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करणे असेल,किंवा सध्या अत्यंत जलदगतीने सुरू असलेली लसीकरण मोहीम असेल.यासाठी कोणतेही साधने उपलब्ध नसताना देखील आपल्या जीवाची पर्वा न करता प्रामाणिकपणे काम करून जनतेची सेवा केली व जनतेला कोरोनाच्या विळख्यातून वाचवण्यासाठी अहोरात्र मेहनत केली.तरी देखील राज्यसरकारने डोळ्यावर भात बांधल्याप्रमाणे जनतेत जाऊन काम करणाऱ्या आशा सेविकांना गेल्या चार महिन्यापासून मानधन दिले नाही.जर राज्यातील आघाडी सरकारने येत्या आठवडाभरात आशा सेविकांना मानधन त्यांच्या खात्यात जमा केले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन भाजप युवामोर्चा करेल असा इशाराही राज्यसरकारला देण्यात आला.याप्रसंगी युवमोर्चा चे जिल्हा कोषाध्यक्ष केशव दवंगे जिल्हा सचिव सचिन शिंदे जिल्हा उपाध्यक्ष कल्पेश पोगुल कार्यकर्ते रवींद्र गाढे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.हे निवेदन देण्यासाठी युवामोर्चा चे तालुका संघटन सरचिटणीस हरिष वलवे ,सरचिटणीस संतोष हांडे,अनिल निळे ,तालुका उपाध्यक्ष सुनील घुले, जग्गु शिंदे जिल्हा सचिव किरण गुंजाळ तालुका प्रसिद्धिप्रमुख अरुण शिंदे,कार्यालय प्रमुख विकास गुळवे,इंजि हरिष चकोर,शिवाजी बाबा आहेर.सुयोग गुंजाळ, अमोल उंडे,सुमित राऊत नितीन अरगडे,, मंगेश बुळकुंडे, चिराग भंगीरे,सोमनाथ बोरसे,विनायक थोरात,सुशांत चौघुले.संजय वाकचौरे. रोहिदास साबळे.माधव थोरातसर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment