पुण्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना गंडविणारी टोळी सक्रीय
हेमंत चौधरी / पुणे
शिक्षणाचे माहेरघर तसेच ' पुणे तिथे काय उणे' असे म्हटल्या जाणाऱ्या पुणे शहरातील विविध भागांत सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना गंडविणारी टोळी सक्रीय असल्याचे दिसुन येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,अनेक सुशिक्षित युवक-युवती पुणे या प्रसिध्द शहरामध्ये आपले गाव,आपल्या घरांतील सदस्यांपासुन लांबवर नोकरी मिळविण्यासाठी पुणे येथे येतात.कारण पुणे येथे अनेक प्रकारच्या कंपन्या,उद्योगधंदे,कारखाने आहेत या कारणाने रोजगार मिळविण्यासाठी युवक-युवती येथे येतात.या पुणे शहरांमधील अनेक भागात जॉब,नोकरीच्या जाहिराती पावलो-पावली लावलेल्या असतात.या माहीतीवर संपर्क क्रमांक दिलेला असतो.त्याचप्रमाणे सुशिक्षित युवक-युवती या संपर्क क्रमांकावर संपर्क करतात व संपर्क केल्यानंतर एखाद्या आॅफीसमध्ये या युवक-युवतींना मुलाखतीसाठी बोलाविले जाते व त्यांना १०००/-,३०००/-,५०००/- रुपये भरा आम्ही तुम्हाला चांगल्या कंपनीमध्ये,चांगल्या प्रकारचा,चांगल्या पगाराचा जॉब देऊ असे सांगुन गंडविले जाते.आपल्या घरापासुन दुर व जॉब,नोकरीच्या शोधासाठी पुणे येथे आल्यानंतर साहजिकच युवक-युवती अशा प्रकारच्या भुलथापांना बळी पडतात व पैसे भरतात.पैसे भरल्यानंतर २ ते ३ दिवसांत आम्ही तुम्हाला अमुक-अमुक कंपनीत जॉब देऊ व तसा फोन आम्ही तुम्हाला करु असे या टोळीमार्फत सांगितले जाते मात्र त्यांच्या या भुलथापांना बळी पडलेले युवक-युवतींना या आॅफीसमधील कोणत्याही व्यक्तिचा फोन येत नाही.मग त्यानंतर स्वत:च युवक-युवती त्या आॅफीसमधील व्यक्तींना संपर्क करतात मात्र त्यांच्याकडुन कोणताही प्रतिसाद मिळत नाही.त्यांच्याकडुन फोन उचलला जात नाही,मोबाईलची रिंग वाजुन-वाजुन संपुन जाते व शेवटी आपण त्या टोळीच्या भुलथापांना बळी पडलो असे समजुन युवक-युवती त्यांचा नाद सोडतात. परिणामी आपल्या गावापासुन,आपल्या परिजनांपासुन दुरवर आलेल्या सुशिक्षित युवक-युवतींना जॉब,नोकरी मिळत नाही त्यामुळे ते हताश होतात.
पुणे शहरातील अशा वरील प्रकारच्या टोळींचा पर्दाफाश करण्यात यावा अशी मागणी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती करतांना दिसुन येत आहेत.
Comments
Post a Comment