शिवराष्ट्र प्रतिष्ठाण ची स्थापना , शेकडो तरुणांच्या उपस्थितीत उद्धाटन..!!संस्थापक विजयराव काळे , शिवाजी चौधरी यांनी बांधली तरुणांची राजकारण विरहीत मोट
शिर्डी / प्रतिनिधी
शिर्डी नजीकच्या निमगाव येथील पालखी निवारा येथे राहता तालुका शिवराष्ट्र प्रतिष्ठाण या संघटनेची स्थापना करण्यात आली..या संघटनेचे संस्थापक म्हणुन शिवाजी चौधरी आणि विजयराव काळे आदीसह तालुक्यातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे प्रतिष्ठाण कोणतेही राजकीय व्यासपीठ नसून या प्रतिष्ठाणात सर्व समाजाचे बांधव समाविष्ट असणार असुन तरुणांचे हक्काचे व्यासपीठ म्हणुन या प्रतिष्ठाणची स्थापना करण्यात आल्याचे सांगत लवकरच प्रत्येक गावात प्रतिष्ठाण ची शाखा सुरु करण्यात येणार असुन चितळी गावात प्रथम शाखेचे भव्य उद्धाटन होणार असल्याचे शिवराष्ट्र प्रतिष्ठाण चे संस्थापक विजयराव काळे यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराजांचे पुजन करत ज्योत लावून कार्यक्रमास सुरवात आली. प्रसंगी शिवराष्ट्र प्रतिष्ठाणचे संस्थापक विजयराव काळे , शिवाजी चौधरी ,निखिल काळे , दिगंबर परजणे , विठ्ठल पवार , अमोल खापटे , सावळीराम डांगे , हनुमंत अवचर , राजाबाबु चौधरी , अतुल चौधरी , पप्पु गाढवे , विजु वायकर , राकेश जाधव , किरण जपे , वैभव कोते , नानक सावंञे , भानुदास कातोरे , तुषार बारहाते , भुषण मोरे , सुनिल परदेशी , राहुल वदक आदीसह शेकडो कार्येकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment