इंधन दरवाढी विरोधात राहाता तालुका युवासेनेचा शिर्डी काळ्या फिती लावून शहरातून सायकल फेरी
शिर्डी / प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल तसेच गँस दरवाढी विरोधात निषेध व्यक्त करत शिर्डी शहरातून सायकल फेरी काढत युवासेना राहाता तालुक्याच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. शिर्डी येथील नगरपंचायत पासून कार्येकर्तांनी काळ्या फिती लावून शहरातून सायकल फेरी काढली. यावेळी युवासेना राहाता तालुका प्रमुख संदिप विघे , उप तालुका प्रमुख प्रताप निर्मळ , युवासेना नेते प्रसाद पाटील , अमरराजे गायकवाड , राजु कुदळे , आदित्य गुंजाळ , कैलास बागुल , राजु धटींग ,ऋषिकेश पगारे , रोहीत मगर , आदीसह पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते. प्रसंगी अमरराजे गायकवाड यांनी मोदी सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध म्हणुन शहरातून शांततेच्या मार्गाने सायकल फेरी काढली असुन जनता या दरावाढीमुळे होरपळून निघाली आहे सर्वसामान्य नागरिकांना आपला उदरनिर्वाह करणे अवघड झाले असुन संपुर्ण महाराष्ट्रात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना सचिव वरुण सरदेसाई , शिर्डी लोकसभा विस्तारक रणजीत कदम यांच्या आदेशाने हे आंदोलन संपुर्ण महाराष्ट्र छेडले असल्याचे सांगितले
Comments
Post a Comment