माथेफीरु तरुणाने किरकोळ कारणावरुन ट्रव्हल्स अॉफीस पेटवले



शिर्डी / प्रतिनिधी 
नगर मनमाड रस्त्यालगत इंडीयन पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या विठ्ठला ट्रव्हल्सला राञीच्या सुमारास एका माथेफीरुने आग लावल्याची घटना घडली आहे.या आगीत ट्रव्हल्स अॉफीसचे मोठे नुकसान झाले असुन खुर्च्या ,  टेबल आणि कागदपत्रे जळून खाक झाली आहे.
याबाबत विठ्ठला रेस्टाँरन्टचे चालक आणि मालक विजय गोंदकर यांनी दिलेल्या माहितीनूसार हा तरुण विठ्ठला रेस्टाँरन्टमध्ये जेवणासाठी आला होता माञ बिल देण्याच्या कारणावरुन त्याने रेस्टाँरन्ट मधील कामगाराशी वाद घातला आणि त्यानंतर राञी दोन अडीचच्या सुमारास समोर असलेल्या विठ्ठला ट्रव्हल्सला आग लावली तर  राञी येवून या तरुणाची समजूत काढली होती माञ माथेफीरु तरुणाने राञी उशीरा ट्रव्हल्स पेटवून दिले असल्याचे विठ्ठला हॉटेलचे मालक विजय गोंदकर यांनी सांगितले. याविषयी शिर्डी पोलीस स्टेशनला माहिती दिली असुन या माथेफीरु तरुणावर योग्य कारवाई केली जाईल असे पोलीसांकडून सांगण्यात आल्याची माहिती गोंदकर यांनी दिली आहे

Comments