नूतन पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करून केला स्वागत सत्कार
साई योग फाउंडेशन द्वारे राहाता पोलिस स्टेशनला नवीनच रुजू झालेले पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड यांच्या हस्ते भल्या पहाटे पोलिस परिसरात वृक्षारोपण केले.तसेच राहता तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या हस्ते त्यांना फेटा बांधून श्रीफळ व शाल देवून सत्कार केला.
याप्रसंगी फाऊंडेशनचे ज्येष्ठ मार्गदर्शक अरविंद बावके यांच्या वाढदिवसनिमित्त गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रसंगी दशरथ तुपे, बाळासाहेब गाडेकर,अरविंद बावके यांनी गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या.पी.आय.गायकवाड यांनी सत्काराला उत्तर देताना फाउंडेशन द्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची प्रशंसा करून स्वतः यात सहभाग घेण्याची इच्छा व्यक्त केली व फाउंडेशनला कायम सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.
यावेळी साकीनाका येथे ३२वर्षीय महिलेवर नराधमांनी केलेल्या अमानुष अत्याचारामुळे मृत्यू झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला.
राहाता नगरपालिकेचे गटनेते विजय सदाफळ,साई योग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ बापुसाहेब पानगव्हाणे,गोरखनाथ दंडवत,योगगुरू सुरेश भिंगार्दिवे,भाऊसाहेब बनकर, मोहनराव तांबे, दिपक दंडवते,राजू वायकर, दिपक गाडेकर,रवींद्र धस,बबलू फतांगरे ,विलास वाळेकर,अनिल सातव,विनोद गाडेकर,विजय बनकर,सुभाष दंडवते,भारत दवंगे,सुधीर खांडरे,संजय वाघमारे,मेजर गोविंद आमकर,उमेश लुटे,व्यंकटेश आहीरे,विजय बावके, सिताराम बावके,भागवत वाघमारे,भास्कर बावके,एस पी दुसाणे,अमोल बोठे,प्रभाकर नावकर,बाळासाहेब तारगे, विठ्ठलराव निर्मळ,इत्यादी सदस्य उपस्थित होते.
Comments
Post a Comment