वार्ड क्र १४ मधील नागरी सुविधा पूर्ण करा , विद्यार्थी कॉग्रेसच्या नगरपंचायतला निवेदन



शिर्डी / प्रतिनिधी 

वार्ड क्रमांक चौदा मध्ये असलेले साई प्रयागा शाळा इथुन आतमध्ये जाणाऱ्या  रस्तावर स्ट्रीट लाईट व रस्ता नाही तसेच साई शताब्दी नगर इथेही रस्ता नाही , स्ट्रीट लाईट नाही ,ड्रेनेज नाही याचबरोबर  अनेक समस्या तिथल्या ग्रामस्थांच्या  समजून घेऊन त्यांच्या सह्या  घेऊन शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे  यांना  विद्यार्थी कॉंग्रेस शिर्डी शहर अध्यक्ष सौरभ हाडवळे यांनी निवेदन दिले आहे.
 यावेळी मुख्याधिकारी डोईफोडे यांनी हे कामे लवकर  पूर्ण करून देण्यात येईल असे आश्वासन हाडवळे यांना दिले आहे.याप्रसंगी 
 कॉंग्रेस शिर्डी शहर अध्यक्ष सचिन  चौगुले ,  युवक शहर अध्यक्ष अमृत  गायके ,उमेश  शेजवळ, माजी नगरसेवक सुरेश भाऊ आरणे, ॲड अविनाश शेजवळ, गोविंद  कोते,समीर शेख, पापाभाई शेख, योहन गायकवाड, कृष्णा गायकवाड, साई पाटले, मोहसीन सय्यद, आदित्य आरणे,पंकज कदम, भूषण आरणे,रॉबिन गुडटी , यश सोनवणे, रोहित हिवाळे,महेश साणा व सर्वे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments