तुझी व्हिकेट पडणार... कॉग्रेस पदाधिकाऱ्यास आलेल्या फोनमुळे कार्यकर्त्यांमध्ये खळबळ



शिर्डी / प्रतिनिधी 
आज संध्याकाळी साधारणतः ७ वाजेच्या सुमारास शिर्डीतील विद्यार्थी कॉग्रेसचे शहराध्यक्ष सौरभ विठ्ठल हाडवळे यांना फोनवर तुझी आणि आणखी एकाची व्हिकेट पडणार असुन तु सावध रहा तसेच याकामी ३० ते ३५ लाखाची बोलणी झाली आहे. या कामात एक मोठा व्यक्ती असुन त्याचे कोणीही काही करु शकत नाही , उभे राहणारे दोन उमेदवार असुन तुमची व्हिकेट पडणार असे सांगण्यात आले आहे. दरम्यान सौरभ हाडवळे यांनी हा विषय कॉग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले व पदाधिकाऱ्यांना सांगताच याविषयी चर्चा होऊन शिर्डी पोलीस स्टेशनचे पो. निरिक्षक गुलाबराव पाटील यांना माहिती दिली असुन सकाळी तक्रार दाखल करणार असल्याची माहिती हाडवळे यांनी दै. साईसंध्याशी बोलतांना दिली आहे.
तर चौगुले यांनी हा विषय मुद्दाम खोड करण्याच्या हेतूने असू शकतो माञ जे भाष्य समोरील व्यक्तीने केले आहे त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही यासाठी पोलीस स्टेशन योग्य ती चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका पदाधिकाऱ्याला असा फोन येऊन सावध राहण्याची तंबी दिल्याने कॉग्रेस पदाधिकारी याप्रकरणी उद्या पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार देणार असुन यात काय तथ्य आहे ते समोर येईल असे कॉग्रेसचे शहर उपाध्यक्ष सुरेश आरणे यांनी सांगितले

Comments