शिर्डीचे शेवटचे पोलिस पाटील कै. विठ्ठलराव नानासाहेब शेळके पाटील यांची आज ३५ वी पुण्यतिथी


शिर्डी गावचे शेवटचे पोलिस पाटील कै. विठ्ठलराव नानासाहेब शेळके पाटील यांची आज ३५ वी पुण्यतिथी असुन यानिमित्तांन दै. साईसंध्याने त्यांच्या कार्याचा घेतलेला काहीसा आढावा..
कै. विठ्ठलराव नानासाहेब शेळके पाटील हे शिर्डी गावचे शेवटचे पोलिस पाटील होते.
ब्रिटिश काळातही या  घराण्याला वतनदार पोलिस पाटीलकी होती. ब्रिटिश कालीन वतनदार पोलिस पाटील तसेच साईबाबांचे समकालीन साईभक्त संताजी भिवशेनराव शेळके पाटील हे विठ्ठलराव शेळके पाटील यांचे आजोबा होते.
  दि. २५ जानेवारी १९५० रोजी शेतकरी व वतनदार घराण्यात विठ्ठलराव यांचा जन्म झाला त्यांचे शिक्षण श्री. साईनाथ माध्यमिक विद्यालय शिर्डी येथे झाले होते.  समाजकार्याचा व पोलिस पाटीलकीचा कौटुंबिक वारसा असल्याने व लहान पणापासून स्वताला समाजकार्याची आवड असल्याने विठ्ठलराव यांना वयाच्या ३३ व्या वर्षी साईनगरीची पोलिस पाटीलकी सांभाळण्याची संधी त्यांना मिळाली. धाडसी व कर्तव्यदक्ष व्यक्तीमत्व म्हणुन त्यांचे पंचक्रोशीत नावलौकिक होते.
त्यांचे चुलते शिर्डी सोसायटीचे संस्थापक , चेअरमन व कोपरगाव पंचायत समितीचे मा. सभापती हरिभाऊ शेळके पाटील यांचे विठ्ठलराव यांना मोलाचे मार्गदर्शन  लाभले होते.  विठ्ठलराव शेळके पाटील यांच्यासह या घराण्यातील वतनदार पोलिस पाटील संताजी शेळके पाटील , शिर्डीचे मा. सरपंच व शिर्डी संस्थानचे मा.विश्वस्त हरीभाऊ शेळके पाटील अशा अनेकांचे शिर्डी शहरातील विकासासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन व योगदान लाभले आहे.
मा. मंञी आण्णासाहेब म्हस्के पाटील , गणेश सह. साखर कारखान्याचे मा. चेअरमन भानुदास दंडवते पाटील , रुई गावचे वसंतराव शंकरराव देशमुख , मा.पंचायत समिती सभापती भागवत काळवाघे पाटील ,शिर्डी गावचे मा. सरपंच मुकुंदराव बाजीराव कोते पाटील , सुधाकर आप्पा शिंदे पाटील , संपत काका गोंदकर पाटील आदी विठ्ठलराव पाटलांचा मिञ परिवार होता.
   शिर्डी गावची समर्थपणे पोलिस पाटीलकी सांभाळणारे विठ्ठलराव शेळके पाटील यांचे २३ सप्टेंबर १९८६ रोजी निधन झाले आणि गावाने एक कर्तव्यदक्ष व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने शिर्डी गाव बंद ठेवून या व्यक्तीमत्वास अखेरचा निरोप दिला.
सामाजिक कार्याची व पोलिस पाटीलकीची  परंपरा लाभलेल्या शेळके घराण्यात ,  शिर्डी विविध सोसायटीचे मा. संचालक कै. संपतराव नानासाहेब शेळके पाटील , पंडीतराव नानासाहेब शेळके पाटील , शामराव नानासाहेब शेळके पाटील हे विठ्ठलराव शेळके पाटील यांचे बंधू तर मिलिंद संपतराव शेळके पाटील , राहुल संपतराव शेळके पाटील हे पुतणे असुन प्रमोद विठ्ठलराव शेळके पाटील , सुनिल विठ्ठलराव शेळके पाटील हे त्यांची मुले आहेत

कै. विठ्ठलराव नानासाहेब  शेळके पाटील यांना ३५ व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 

शब्दांकन - राजेंद्र बनकर शिर्डी

Comments