शिर्डीत होणाऱ्या महा लसीकरणाचा नागरिकांनी लाभ घ्यावा - शिवाजी गोंदकर नगराध्यक्ष शिर्डी न.पं.
शिर्डी / प्रतिनिधी
सध्या जगभरामध्ये कोरोना विषाणू या व्हायरसची साथ सुरु आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणुन राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत त्यामुळे शिर्डीतील बहुतेक दुकाने आस्थापना बंद आहेत. गेल्या सहा महिन्याच्या प्रतिक्षेनंतर दि. ७ अॉक्टोबर २०२१ रोजी श्री साईबाबा मंदिर उघडणार असल्याने संपुर्ण शिर्डी शहराचे नागरिकांच्या सुरक्षेसाठी लसीकरण होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आ.राधाकृष्ण विखे पाटील व खा. सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच शिर्डी नगरपंचायत व राहाता ग्रामीण रुग्णालय यांचे संयुक्त विद्यमाने संपुर्ण शिर्डी शहराचे लसीकरण होण्यासाठी कोरोना प्रतिंंधात्मक लसीचे ५००० डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहे.यासाठी शिर्डी शहरात प्रभागनिहाय पाच लसीकरण केंद्रे उभारण्यात आलेले आहे. शिर्डी शहरातील उर्वरित नागरिकांचे लसीकरण व्हावे याकरिता दि. १ अॉक्टोबर ते ७ अॉक्टोबर दरम्यान ही लसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे. तरी ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले नाही अशा सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन शिर्डी नगरपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री साईबाबांचे मंदिर उघडल्यानंतर शासनाचे नियमानुसार मंदिर प्रवेशासाठी व शिर्डी शहरातील सर्व खाजगी आस्थापना व दुकाने सुरु ठेवण्यासाठी लसीकरणाचे दोन डोस बंधनकारक ठेवण्याची शक्यता आहे.तरी शिर्डी शहरातील ज्या नागरिकांनी दोन डोस घेतलेले नसतील अशा व्यक्तींनी या लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर , उपनगराध्यक्ष सचिन कोते , मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी केले आहे
Comments
Post a Comment