कनकुरी परिसरात बिबट्यांचा वावर , नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

शिर्डी / प्रतिनिधी 
शिर्डी नजीकच्या कनकुरी येथील पंचमुखी गणेश मंदिर परिसरातील डांगे वस्तीवर ग्रामस्थांना एकाच वेळी तीन ते चार बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. रवीवारी संध्याकाळी घरासमोरील ऊसालगत बिबटे दिसले असुन यापुर्वी परिसरात प्राण्यांवर हल्ला करुन त्यांना ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत त्यातच आता काही पिकांची  मशागत करत असतांना शेतकऱ्यांना प्राण्याचे अवयव आढळून येत असुन शेतकरी वर्गात बिबट्याची दहशत पसरली असल्याचे यावेळी विकास डांगे , वैभव डांगे , सुनिल डांगे , अजय व्यवहारे , नाना आहिरे आदींनी सांगितले आहे. तर रस्त्यावरून जातांना अनेक वाटसरुंनाही या बिबट्याचे दर्शन होत असल्याने संध्याकाळ नंतर परिसरातील नागरिक भितीच्या सावटाखाली राहत असल्याचे विकास डांगे यांनी सांगितले.
कनकुरी ग्रामस्थांनी  वनविभागाकडे पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे.

Comments